मुंबई : घरची परिस्थिती बेताची असल्याने दहावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यावर भरत राठोड (२३ वर्ष) याने नोकरी करण्यास सुरुवात केली. घाटकोपर येथील गोळीबार रोड परिसरात राहणारा भरत एका औषध वितराकाकडे कामाला होता. सोमवारी तो आणि त्याचा कामावरील एक सहकारी औषधाचे वितरण करून पुन्हा कार्यालयाकडे येत असताना पेट्रोल भरण्यासाठी पंपावर गेले. वादळ आणि जोरात पावसापासून आडोसा म्हणून ते फलकाखाली थांबले. त्यावेळी झालेल्या दुर्घटनेत भरतचा मृत्यू झाला तर त्याचा सहकारी जखमी झाला. त्याने ही घटना कार्यालयात कळविली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : मुंबई: दोन दिवसांपूर्वी गावी जाण्यासाठी तिकिट काढले; मात्र काळाने झडप घातल्याने गावी न्यावा लागणार मृतदेह

भरत हा घरातील एकटाच कमावणारा होता. त्याचे वडील नेहमी आजारी असतात. नुकतेच दोन दिवसांपूर्वी त्यांना राजावाडी रुग्णालयातून घरी नेण्यात आले होते. त्यांच्यावर रुग्णालयात १५ दिवस उपचार सुरू होते. भरतच्या आईचे करोनामुळे निधन झाले आहे, अशी माहिती भरतचा मित्र श्रीकांत तेलंगे याने दिली. भरतच्या निधनाने घरातील कमवता, कुटुंबाचा आधार हरपला आहे. त्याचप्रमाणे घाटकोपर येथील कामराज नगर येथे राहणारे मोहम्मद अक्रम (४८) हे रिक्षा चालक असून, ते गॅस भरण्यासाठी पंपावर गेले होते. मात्र या दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला. अक्रम हे घरातील एकमेव कमावते होते. त्यांच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.