मुंबई : घाटकोपर येथील महाकाय जाहिरात फलक कोसळण्याची घटना हे प्राक्तन होते, असा अजब दावा करून जामिनाची मागणी करणारा प्रकरणातील मुख्य आरोपी आणि जाहिरात कंपनीचा संचालक भावेश भिंडे याच्या याचिकेवर तपशीलवार म्हणणे सादर करा, असे आदेश उच्च न्यायालयाने शुक्रवारी मुंबई पोलिसांना दिले.

भिंडे याने याचिकेत बेकायदेशीर अटकेचा मुद्दा देखील उपस्थित केला आहे. फौजदारी प्रक्रिया संहितेच्या (सीआरपीसी) कलम ४१ अ अंतर्गत अटकेपूर्वी आरोपीला नोटीस बजावणे अनिवार्य आहे. परंतु, आपल्याला या नोटिशीविना अटक करण्यात आली, असा दावा भिंडे याने केला असल्याकडे न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने लक्ष वेधले. तसेच, बेकायदेशीररित्या नजरकैदेत ठेवल्यास तात्काळ सुटका करावी लागेल, असे अनेक निवाडे असल्याने याबाबतही पोलिसांना आपली भूमिका स्पष्ट करावी लागेल, असे स्पष्ट केले.

ATM money theft pune, thief caught pune,
पुणे : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पकडले; सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांची तत्परता
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
congress mp abhishek manu singhvi remarks on cji chandrachud
चंद्रचूड यांच्या कार्यकाळात सत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर पडणे अतर्क्य ; सिंघवी
Pune Loot, bikers robbed pune, pune crime news,
पुणे : शहरात लुटमारीचे प्रकार वाढीस, दुचाकीस्वार तरुणांना लुटले
Devendra Fadnavis Dharni, Chikhaldara Skywalk Work,
‘चिखलदरा स्‍कायवॉकचे काम महाविकास आघाडीने थांबविले’, उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणीसांचा आरोप
Tuljapur Devanand Rochkari, Tuljapur, Dheeraj Patil,
तुळजापुरात मैत्रीपूर्ण लढत की, आघाडीत बिघाडी? मविआचा अधिकृत उमेदवार कोण? रोचकरी की, पाटील?
nashik vidhan sabha
नाशिक परिक्षेत्रात २५ दिवसांत ५० कोटींचा मुद्देमाल जप्त, १७ हजार गुन्हेगारांविरुध्द कारवाई
sushma andhare
Sushma Andhare: ‘केलंय काम भारी’वरून अंधारेंचा हल्लाबोल, अंबरनाथच्या सभेत आमदार किणीकरांसह शिंदे गटातील गटबाजीवरही बोट

हेही वाचा : रमाबाई आंबेडकर नगर पुनर्विकास : १६ हजार ५७५ पैकी केवळ ७ हजार ५२९ रहिवासी पात्र

त्यावर, भिंडे याने याचिकेत उपस्थित केलेल्या सगळ्या मुद्द्यांवर सविस्तर प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात येईल, असे सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांनी न्यायालयाला सांगितले. त्यानंतर, न्यायालयाने प्रकरणाची सुनावणी २६ जुलै रोजी ठेवली. दरम्यान, या प्रकरणी आपल्याविरोधात करण्यात आलेले आरोप हे निरर्थक आणि बेकायदेशीर आहेत, असा दावा करून गुन्हा रद्द करावा आणि याचिकेवर अंतिम निर्णय दिला जाईपर्यंत आपल्याला जामीन मंजूर करावा, अशी मागणी भिंडे याने केली आहे.

हेही वाचा : आरटीई कायद्यातील दुरुस्ती घटनाबाह्य, उच्च न्यायालयाचा निर्वाळा

घटनेच्या दिवशी म्हणजेच १३ मे रोजी वादळी वाऱ्यासह धुळीचे वादळ येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यास भारतीय हवामान विभाग अपयशी ठरला. त्या दिवशी अनपेक्षितरीत्या ताशी ९६ किमी प्रतितास वेगाने वारे वाहू लागले. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे हा महाकाय जाहिरात फलक कोसळला आणि त्या दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी दाखल गुन्ह्यातही बांधकामातील निष्काळजीपणामुळे फलक कोसळल्याचे नमूद केलेले नाही. त्यामुळे, तो महाकाय जाहिरात फलक कोसळणे ही नियती होती व त्यासाठी आपल्याला किंवा इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला दोषी धरता येणार नाही, असा दावा भिंडे याने याचिकेत केला आहे. आपल्याविरोधात राजकीय दबावापोटी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तो निराधार आणि चुकीचा आहे, असा दावेही भिंडे याने जामिनाची व गुन्हा रद्द करण्याची मागणी करताना केला आहे.