१३ मे रोजी मुंबईत झालेल्या बेमोसमी पावसामुळे आणि प्रचंड वादळी वाऱ्यांमुळे घाटकोपरचं महाकाय होर्डिंग कोसळून १६ जणांचा बळी गेला. ही संख्या आता १७ वर पोहचली आहे. कारण या घटनेतील आणखी एका जखमी व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या अपघातातील जखमींची संख्या ७३ झाली आहे. तसंच या प्रकरणात एसआयटी चौकशी करण्यात येणार आहे.

नेमकी काय घडली घटना?

घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर १२० बाय १२० स्क्वेअरफुटांचं महाकाय होर्डिंग लावण्यात आलं होतं. या जाहिरातीच्या होर्डिंगच्या मंजुरीवरून आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. परंतु, कोसळलेल्या या फलकाखाली अनेक गाड्या दबल्या होत्या. जवळच पेट्रोल पंप असल्याने तिथे बचावकार्यास अडचणी येत होत्या. त्यामुळे गेल्या ४८ हून अधिक तास तिथे बचावकार्य चाललं होतं.

jewellery shop employee dies in shooting
शहापूर हादरले! सराफाच्या दुकानातील कर्मचाऱ्याचा गोळीबारात मृत्यू
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
death of young man walking with a Jain Sadhvi in accident
जैन साध्वी सोबत चालत जाणाऱ्या युवकाचा अपघाती मृत्यू
ghatkopar 8 year old boy died after fell in water tank boys father alleges society
घाटकोपरमधील मुलाच्या मृत्यू प्रकरणात सोसायटीवर गुन्हा
Tarun Bhati boating accident survivor doctors of St George Hospital
प्रवासी बोटीला जलसमाधी, नौदलाच्या ‘स्पीड बोटी’ची धडक; १३ मृत्युमुखी
Gateway Of India Boat Accident
Mumbai Boat Accident : मुंबईतील बोट दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू, तर मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर
navi Mumbai in last few years accident and death decreased
पालिकेच्या परिवहन उपक्रमात अपघातांच्या संख्येत मात्र घट
navi mumbai municipal administration unaware of construction developer of building in koparkhairane
खड्ड्यात पडून मृत्यूप्रकरण; बांधकाम विकासकाविषयी प्रशासन अनभिज्ञ

हे पण वाचा- Pune Porsche Accident: पुणे पोर्श अपघात, घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेवर मराठी दिग्दर्शकाची पोस्ट, “आपण फक्त श्रद्धांजलीच्या पोस्ट..”

गॅस कटरच्या मदतीने होर्डिंग काढण्यात आलं

गॅस कटरच्या सहय्याने हे होर्डिंग काढण्यात आलं. त्यानंतर होर्डिंगखाली दबलेल्या गाड्या बाहेर काढण्यात आल्या. त्यापैकी एका कारमध्ये दोन मृतदेह सापडले आहेत. एनडीआरएफकडून हे प्रयत्न सुरू असताना त्यांनी आधीच मृतांची संख्या वाढणार असल्याचं सूचित केलं होतं. त्यानुसार, १६ तारखेला उशिरा दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यामुळे एकूण मृतांची संख्या १६ झाली होती. आता आज मिळालेल्या माहितीनुसार या घटनेतील मृतांची संख्या १७ झाली आहे तर ७३ जण जखमी आहेत.

हे पण वाचा- Pune Porsche Accident:दोन निष्पाप जीव घेणाऱ्या पोर्शचा वेग किती होता? पंचनाम्यात समोर आलं वास्तव

फलक हटवण्यास इतका वेळ का गेला?

ज्वलनशील पदार्थांच्या साठ्यामुळे बचाव मोहिमेत काळजीपूर्वक हाताळणी करण्यात आली. लोखंडी खांब कापताना ठिणगी उडून आगीसारखी दुर्घटना घडू नये यासाठी विशेष खबरदारी बाळगावी लागत होती. ती घेऊनही बुधवारी सकाळी काम सुरू असताना अचानक तेथे आग लागली होती. मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच पाण्याचा मारा केल्याने ही आग तातडीने आटोक्यात आणण्यात आली आणि त्यानंतर काम पुन्हा सुरू झालं होतं. कोसळलेल्या फलकाचे सुटे भाग करण्यात आले असून या सुट्या भागांसह सगळा ढिगारा हटवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू होतं. फलकाचे चार मोठे खांब हटवल्याशिवाय मदतकार्य पूर्ण होणार नव्हतं. प्रत्येक खांब तुकड्यांमध्ये कापून तो वेगळा केला गेला त्यामुळे बचावकार्यास उशीर झाला.

Story img Loader