Bhavesh Bhinde News : मुंबईतल्या घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून १४ जणांचा मृत्यू झाला. सोमवारी ही घटना घडली. या कंपनीचे मालक भावेश भिंडे बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली. त्यांचा फोनही बंद आहे. जे होर्डिंग कोसळलं ते बेकायदेशीर असल्याचं समोर आलं. या दुर्घटनेनंतर भावेश भिंडे बेपत्ता आहेत असं पोलिसांनी म्हटलं आहे. मुंबईत सोमवारी वादळी वाऱ्यांसह पाऊस पडला. ६० किमी प्रति तास वारे वाहात होते. यावेळी घाटकोपर या ठिकाणी असलेलं हे होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळलं त्याखाली अनेक लोक अडकले होते. या अपघातात १४ जणांचा मृत्यू झाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोण आहेत भावेश भिंडे?

मुंबईत १३ मे अचानक वादळी वारे वाहू लागले. सर्वत्र धुळ पसरली होती. वाऱ्याचा वेग ६० किमी प्रतितास होता. परिणामी घाटकोपर येथील पूर्व द्रुतगती मार्गावर लावलेला होर्डिंग कोसळला. या दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू झाला. इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने हे होर्डिंग लावले होते. भावेश भिंडे हे याच कंपनीचे संचालक आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय घडली घटना?

मुंबईत झालेल्या वादळी वाऱ्यामुळे घाटकोपर येथील महाकाय लोखंडी जाहिरात फलक पेट्रोल पंपावर कोसळला. या दुर्घटनेत आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. १४० बाय १४० चौरस फुटांचा हा फलक क्षणार्धात कोसळल्याने जवळ असलेली वाहने आणि शंभरहून अधिक नागरिक त्याखाली सापडले. या दुर्घटनेत ७४ जण जखमी झाले आहेत. त्यामुळे एकूण पीडितांची संख्या ८८ झाली आहे. ही माहिती ANI ने दिली आहे.

हे पण वाचा- घाटकोपर दुर्घटनेतील मृतांची संख्या १४ वर; NDRF ने सांगितला बचावकार्यातील मोठा अडथळा, घटनास्थळी काय घडतंय?

मुंबई महापालिकेने काय म्हटलं आहे?

मुंबई पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, दुर्घटनास्थळी चार होर्डिंग्स होते. यासाठी मुंबई रेल्वे पोलीस आयुक्तालयातील सहाय्यक पोलीस आयुक्तांनी परवानगी दिली होती. मात्र होर्डिंग्ज उभारण्यापूर्वी बीएमसीची कोणतीही परवानगी/एनओसी एजन्सी/रेल्वेकडून घेण्यात आली नव्हती.

बिलबोर्ड बांधणाऱ्या M/S Ego Media या एजन्सीविरुद्धही तक्रार नोंदवण्यात आली होती व बीएमसीसुद्धा त्यांच्या विरुद्ध एफआयआर दाखल केली होती. बीएमसी जास्तीत जास्त ४० x ४० चौरस फूट होर्डिंग उभारण्याची परवानगी देते मात्र, कोसळलेले होर्डिंग १२० x १२० चौरस फूट आकाराचे होते. सध्या बीएमसी एन वॉर्डच्या सहाय्यक आयुक्तांनी एजन्सीला बीएमसीची वैध परवानगी नसल्याबद्दल त्यांचे सर्व होर्डिंग तातडीने काढून टाकण्याची नोटीस बजावली आहे. तसंच पोलिसांकडून भावेश भिंडेंचा शोध घेतला जातो आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ghatkopar hoarding owner bhavesh bhinde missing phone switched off said mumbai police scj