घाटकोपर येथील ४९ वर्षे जुन्या जलाशयाची दुरुस्ती करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. या कामासाठी महानगरपालिका १० कोटी खर्च करणार आहे. दीड वर्षात हे काम पूर्ण करण्यात येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>Video: “सोनू निगम स्टेजवरून उतरत असताना…”, ठाकरे गटाच्या नेत्या सुप्रदा फातर्पेकरांनी मागितली माफी; सांगितला धक्काबुक्कीचा घटनाक्रम!

घाटकोपर परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयाची संरचनात्मक दुरुस्ती करण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. हा जलाशय १९७३ मध्ये बांधण्यात आला असून तो दोन कक्षात विभागला आहे. त्याची एकूण पाणी साठवण क्षमता ११.३५ दशलक्ष लिटर इतकी आहे. महानगरपालिकेने या जलाशयाची संरचनात्मक तपासणी करून घेतली असून जलाशयात व्यापक संरचनात्मक दुरुस्ती करण्याची गरज असल्याचे अहवालात म्हटले आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाने ही कामे हाती घेतली आहे.

जलाशयातून होणारी गळती रोखणे, जलाशयाच्या भिंतीचे सिमेंट काँक्रिटीकरण करणे, जलाशयाच्या आतील स्तंभ व पायऱ्यांची दुरुस्ती करणे ही कामे हाती घेण्यात येणार आहेत. या कामासाठी नऊ कोटी ५३ लाख रुपये खर्च येणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ghatkopar reservoir will be repaired at a cost of nine and a half crores mumbai print news amy