दिवंगत अभिनेते बबन प्रभू आणि फार्स यांचे अतूट असे नाते होते. बबन प्रभू यांचे नाव घेतले की ‘झोपी गेलेला जागा झाला’, ‘दिनूच्या सासुबाई राधाबाई’ अशी गाजलेली फार्सिकल नाटके आठवतात. याच यादीत ‘घोळात घोळ’ या फार्सचाही आवर्जून उल्लेख केला पाहिजे. काही वर्षांपूर्वी गाजलेले हे नाटक नुकतेच नव्या संचात पुन्हा एकदा रंगभूमीवर दाखल झाले आहे. दिग्दर्शक विजय केंकरे दिग्दर्शित करत असलेले हे ५१ नाटक असून या निमित्ताने त्यांनी ‘फार्स’ हा प्रकार हाताळला आहे. अभिनेते रमेश भाटकर या नाटकात पहिल्यांदाच एका विनोदी भूमिकेत असून नाटकात संजय नार्वेकर, हेमंत ढोमे, विजय पटवर्धन, रसिका आगाशे, रुई पवार, नेहा कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. राजन भिसे यांचे नेपथ्य असून निर्माते संतोष शिदम यांच्या ‘मल्हार’ या संस्थेतर्फे हे नाटक पुन्हा एकदा प्रेक्षकांना हसविण्यासाठी सादर झाले आहे.
‘घोळात घोळ’ चे रंगभूमीवर पुनरागमन
दिवंगत अभिनेते बबन प्रभू आणि फार्स यांचे अतूट असे नाते होते. बबन प्रभू यांचे नाव घेतले की ‘झोपी गेलेला जागा झाला’, ‘दिनूच्या सासुबाई राधाबाई’ अशी गाजलेली फार्सिकल नाटके आठवतात.
First published on: 19-10-2013 at 01:31 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gholat ghol play return to the stage