पुणे महानगर विकास प्राधिकरणचे अध्यक्ष व अन्न-नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांचा मुलगा गौरव बापट आणि सुनील माने हे दोघे जपान दौऱ्यावर असले तरी दौऱ्यातील मंत्री व शासनाचे अधिकारी यांच्याव्यतिरिक्त इतर कोणाचाही कोणताही खर्च शासन अथवा पुणे महानगर विकास प्राधिकरण किंवा पुणे महापालिका करणार नाही, असे बापट यांच्या अन्न व नागरी पुरवठा खात्याने स्पष्ट केले आहे.
स्वत: गिरीश बापट, प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश झगडे आणि महापालिका आयुक्त कुणाल कुमार हे तिघेच जपानच्या शासकीय दौऱ्यावर गेले आहेत.
गौरव बापट व सुनील माने यांचा समावेश शासकीय चमूत नसल्याने त्यांचा खर्च केला जाणार नाही, असा खुलासा या खात्यामार्फत करण्यात आला आहे.