जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची माहिती
जलसंपदा विभागाच्या सल्लागारपदी नेमण्यात आलेल्या हि.ता. मेंढेगिरी यांचा राजीनामा अद्याप मंजूर करण्यात आलेला नसून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी ‘लोकसत्ता’ ला सांगितले.
निवृत्तीनंतर जलसंपदा विभागाच्या सल्लागारपदी नेमलेल्या मेंढेगिरी यांनी सरकारला काही बाबींविषयी सल्ला दिला आहे. पण त्याकडे काणाडोळा करुन त्यांची कोंडी करण्यात आल्याने त्यांनी राजीनामा दिला आहे. तो सरकारने मंजूर केला आहे का, याबाबत विचारता राजीनामा मिळालेला असून त्याबाबत निर्णय झालेला नसल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले.
मेंढेगिरींबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची माहिती
Written by लोकसत्ता टीम
Updated:
First published on: 12-03-2016 at 00:02 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Girish mahajan will discuss with devendra fadnavis about mendhegiri