पावसाने दडी मारली असली तरी रस्त्यावरील खड्डे कमी होण्याची चिन्हे दिसत नसून या खड्डय़ांमुळे अपघात मात्र होत आहेत. अशाच खड्डय़ांमुळे एका तरुणीला गंभीर अपघात झाला आणि तिला आता मृत्यूशी झुंजावे लागत आहे. या प्रकरणी पोलीस आरोपी ट्रकचालकाचाही शोध घेऊ शकलेली नाही.
मल्लिका कपूर (२३) असे या तरुणीचे नाव आहे. एमबीए झालेल्या या तरुणीलादीड महिन्यांपूर्वी नोकरीही मिळाली होती. १७ सप्टेंबर रोजी ती गोरेगावहून बोरिवली येथे मित्रासोबत मोटरसायकलने जात होती. त्याचवेळी हब मॉल येथे सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास खड्डय़ामुळे मोटरसायकलवरील ताबा सुटला आणि मागे बसलेली मल्लिका खाली पडली. त्याचवेळी तिच्या कमरेवरून ट्रक गेल्याने ती गंभीर जखमी झाली. तिला अंधेरी पश्चिमेतील कोकिळाबेन इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.

Story img Loader