‘हवाई सुंदरी’ या पदासाठीचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतरही नोकरी न मिळाल्याने त्या नैराश्यातून आलिया शेख (२४) या तरुणीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी रात्री नायगाव-वसई येथे घडली. चादरीचा गळफास लावून तिने आत्महत्या केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
आलियाचे वडील रिक्षाचालक असून तिने ‘हवाई सुंदरी’ या पदासाठीचा अभ्यासक्रम काही वर्षांपूर्वी पूर्ण केला होता. मात्र नोकरी न मिळाल्याने तिने आत्महत्या केल्याचे सांगण्यात येते. माणिकपूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक गवारी अधिक तपास करत आहेत.
नैराश्यातून तरुणीची आत्महत्या
‘हवाई सुंदरी’ या पदासाठीचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतरही नोकरी न मिळाल्याने त्या नैराश्यातून आलिया शेख (२४) या तरुणीने गळफास लावून
First published on: 18-11-2013 at 02:38 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Girl commits suicide out of depression