‘हवाई सुंदरी’ या पदासाठीचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतरही नोकरी न मिळाल्याने त्या नैराश्यातून आलिया शेख (२४) या तरुणीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी रात्री नायगाव-वसई येथे घडली. चादरीचा गळफास लावून तिने आत्महत्या केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.  
आलियाचे वडील रिक्षाचालक असून तिने ‘हवाई सुंदरी’ या पदासाठीचा अभ्यासक्रम काही वर्षांपूर्वी पूर्ण केला होता. मात्र नोकरी न मिळाल्याने तिने आत्महत्या केल्याचे सांगण्यात येते. माणिकपूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक गवारी अधिक तपास करत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Girl commits suicide out of depression