गिरगावातील चंदनवाडी परिसरात रविवारी रात्री एका इमारतीचे प्लास्टर अंगावर पडल्यामुळे आठ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. चोवीस मजली इमारतीचे बांधकाम सुरू असून त्याचा काही भाग या मुलीवर कोसळला. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

हेही वाचा – “करोना काळात वीरप्पन गँगचा घोटाळा”, असे म्हणत संदीप देशपांडेंनी उघड केली युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांची नावे

हेही वाचा – विमानतळावर आढळलेल्या करोनाबाधित रुग्णांची संख्या २७ वर

गिरगावातील श्रीकांत पालेकर मार्गावर श्रीपती अपार्टमेंट्स या चोवीस मजली इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या इमारतीच्या प्लास्टरचा काही भाग रविवारी रात्री आठ वाजता अचानक उंचावरून खाली पडला. यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या एका आठ वर्षीय मुलीच्या अंगावर हे प्लास्टर पडले. त्यात ती गंभीर जखमी झाली. मुलीला तातडीने जवळच्या हरकीसनदास रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान मध्यरात्री दीड वाजता मुलीचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी असलेला राडारोडा हटवला. तसेच सुरक्षेच्या कारणास्तव इमारतीचा परिसर प्रतिबंधित करण्यात आला आहे.

Story img Loader