पोक्सो व माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल

मुंबई : लंडनमधून मुंबईत आलेल्या तरूणीवर वाढदिवसाच्या समारंभात अत्याचार करण्यात आला असून त्याचे चित्रीकरण स्नॅपचॅट या समाज माध्यमांवर प्रसारित झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या चित्रीकरणाबाबत समजल्यानंतर तरूणीने याप्रकरणी कफ परेड पोलिसांकडे तक्रार केली. तिच्या तक्रारीवरून कफ परेड पोलिसांनी अनैसर्गिक अत्याचार, विनयभंग, बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा (पोक्सो) व माहिती तंत्रज्ञान गैरवापर प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुरूवारी गुन्हा दाखल केला.

हेही वाचा >>> कारागृहात गळफास लावून आरोपीची आत्महत्या

vasai gangrape marathi news
अश्लील चित्रफितीच्या आधारे धमकावले, अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
40 year old construction worker arrested for sexually assaulting eight year old boy in Bijlinagar of Chinchwad
पिंपरी : चिंचवडमध्ये आठ वर्षीय मुलावर अत्याचार
Crime News
Crime News : TikTok वर व्हिडीओ पोस्ट करण्यावरून पोटच्या १५ वर्षीय मुलीचं ‘ऑनर किलिंग’; US मधून पाकिस्तानात परतल्यानंतर बापाने घातल्या गोळ्या
Crime News
नराधमाने ओलांडल्या क्रूरतेच्या सीमा, पोटच्या मुलांदेखत महिलेवर बलात्कार; पती घरी येताच अ‍ॅसिड…
class 6 girl school raped in Porbandar
शिक्षकाचा सहावीतल्या विद्यार्थीनीवर बलात्कार; वाच्यता केल्यास खिडकीतून फेकण्याची दिली होती धमकी
Three youths arrested for abusing a college student in Tathawade pune news
पिंपरी: ताथवडेत महाविद्यालयीन विद्यार्थ्यावर अत्याचार; तीन तरुण अटकेत
rape on minor girl
प्रजासत्ताक दिनी ७० वर्षीय इसमाचा ४ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला अटक

पीडीत तरूणी १७ वर्षांची असताना २०२० मध्ये हा प्रकार घडल्याचे सूत्रांनी सांगितले. पीडित मुलगी लंडनमधील रहिवासी आहे. ती २०२० मध्ये आजी-आजोबांकडे राहत होती. त्यावेळी ती १७ वर्षांची होती. त्यांच्या मित्राचा वाढदिवस असल्यामुळे २८ फेब्रुवारी २०२० रोजी कफ परेड येथे एका छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात उपस्थित तरूणाने पीडित तरूणीला दारू पाजली. त्यानंतर शौचालयात पीडित मुलीवर अत्याचार केला. त्यावेळी आरोपीने पीडित तरूणीच्या नकळत तिचे चित्रीकरण केले. त्यानंतर स्नॅपचॅट या समाज माध्यमांवर आरोपीने हे चित्रीकरण प्रसारित केले.

हेही वाचा >>> Mumbai Local Mega Block Update : तिन्ही रेल्वे मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक

याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पीडित तरूणीने नुकतीच याप्रकरणी मुंबई पोलिसांकडे तक्रार केली होती. त्या तक्रारीच्या आधारे कफ परेड पोलीस ठाण्यात गुरूवारी नैसर्गिक अत्याचार, विनयभंग, बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा (पोक्सो) व माहिती तंत्रज्ञान गैरवापर प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कफ परेड येथील उच्चभ्रू सोसाटीमधील सदनिकेत हा प्रकार झाला असून याप्रकरणी तरूणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Story img Loader