मुंबई : पश्चिम रेल्वेवरील ग्रॅन्ट रोडजवळ धावत्या लोकलमध्ये एका तरुणाने २४ वर्षीय तरुणीची छेड काढण्याचा प्रयत्न केला. या तरुणाविरोधात मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मालाड येथे राहणारी तरुणी शुक्रवारी रात्री कामानिमित्त चर्नी रोड येथे लोकलने जात होती. ग्रॅन्ट रोड स्थानक येताच एका तरुणाने तिची छेड काढण्याचा प्रयत्न केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तसेच अश्लील चाळे, अश्लील वक्तव्य करीत तो तरुणीला त्रास देत होता. संबंधित तरुणीने आरडाओरडा केला असता त्या तरुणाने लोकलचा वेग कमी होताच उडी मारून पळ काढला. याप्रकरणी बुधवारी मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाण्यात तरुणीने तक्रार दाखल केली. या आधारे पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तांत्रिक आणि इतर पद्धतीने आरोपीचा शोध सुरू केला आहे.गेल्या काही दिवसांपासून लोकलमध्ये महिलांना त्रास देणे, विनयभंग अशा घटना वारंवार घडत असल्याने संताप व्यक्त होत आहे.