धारावीत एका १७ वर्षीय महाविद्यालयीन तरुणावर अ‍ॅसिडने हल्ला करण्यात आला. बुधवारी संध्याकाळी ही घटना घडली. त्याच्यावर शीव रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा हल्ला त्याच्या वडिलांनीच केला असल्याचा आरोप मुलाच्या आईने केला. विग्नेश बाघले (१७) हा तरुण धारावीतील अबू बखर चाळीत आईसह रहातो. त्याच्या आई- वडिलांमध्ये कौटुंबिक वाद असून वडील चंद्रकात वेगळे राहतात. बुधवारी संध्याकाळी विग्नेश महाविद्यालयातून घरी परतत होता. अज्ञात व्यक्तीने त्याच्या पाठीवर अ‍ॅसिड फेकले. त्यात त्याची पाठ भाजली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.  विग्नेशची आई हिराबाई (४५) आणि चंद्रकांत यांच्यात घटस्फोटाचा वाद सुरू होता. त्याने धमकी दिली होती. त्यामुळे  हल्ला चंद्रकातनेच केला असावा, असा आरोप आई हिराबाई आणि मावशी रेखा यांनी केला . चंद्रकांत याचा शोध सुरू असल्याची माहिती परिमंडळ ५ चे पोलीस उपायुक्त धनंजय कुलकर्णी यांनी दिली.

Story img Loader