मुंबई : सातवीत शिकणाऱ्या १३ वर्षांच्या मुलीने शाळेच्या इमारतीवरून उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी सकाळी कांजूर मार्ग येथे घडली आहे. या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत. कांजूर मार्ग येथील इंग्रजी शाळेत ही विद्यार्थ्यांनी सातवीत शिकत असून सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे ती शाळेत गेली. मात्र काही वेळाने ही मुलगी नैसर्गिक विधीचे कारण देऊन ती आधी शाळेच्या छतावर गेले. त्यानंतर काही वेळाने शाळेच्या दुसऱ्या मजल्यावरून तिने उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.
काही तरी पडल्याचा आवाज ऐकून शिक्षकानी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी ही मुलगी जखमी अवस्थेत पडली होती. तिला तात्काळ नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले. सध्या तिच्यावर परिसरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विद्यार्थ्यांनीच्या वडिलांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले व तिच्या आईसोबत राहते. वडिलांच्या निधनानंतर आलेल्या नैराश्यातून तिने हे कृत्य केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. कांजूर मार्ग पोलिसांनी याबाबत घटनेची नोंद केली असून या मुलीने आत्महत्येचा प्रयत्न का केला याचा तपास पोलीस करत आहेत.