कांदिवली पूर्व येथे गुरुवारी २७ वर्षीय महिलेचा मृतदेह सापडला होता. या महिलेच्या हत्येप्रकरणी तिच्या प्रियकराला कुरार पोलिसांनी अटक केली. या महिलेच्या डोक्यावर आणि गळ्यावर शस्त्राने वार करण्यात आल्याचे निदर्शनास आले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मनिषा पृथ्वीलाल जैस्वार असे मृत महिलेचे नाव असून कांदिवली येथील गोकुळ नगरमधील चाळीत ती एकटीच राहात होती. तिचा चुलत भाऊ सुरेश जैस्वारने बुधवारी मध्यरात्री पोलिसांना दूरध्वनी करून त्याच्या चुलत बहिणीने आत्महत्या केल्याची माहिती दिली. त्यानुसार कुरार पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता महिलेच्या डोक्यावर व गळ्यावर धारधार शस्त्राने वार केल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर मनिषा हिला तात्काळ शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण तेथील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर तिला मृत घोषित केले.

मृत महिला गेल्या दीड वर्षांपासून कामानिमित्त मुंबईत एकटीच राहत होती. तिचे आई-वडील उत्तर प्रदेशात वास्तव्यास आहेत. याप्रकरणी कुरार पोलिसांंनी अपमृत्यूची नोंद केली आहे. पण महिलेचा मृत्यू संशयास्पद असून शवविच्छेदन अहवालानंतर याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी कुरार पोलिसांनी महिलेचा प्रियकर अखिलेश कुमार प्यारेलाल गौतम याला मानखुर्द रेल्वे स्थाकावरून अटक केली. मनिषा व अखिलेश यांचे लग्न होणार होते. पण चारित्र्याच्या संशयावरून मनिषाची हत्या केल्याची कबुली अखिलेशने चौकशीत दिली.