अश्लील एसएमएस पाठवून छेडछाड करणाऱ्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणाऱ्या बदलापूर येथील १९ वर्षीय तरुणीच्या मानेवर दोन अज्ञात इसमांनी मोटार सायकलवरून येऊन ब्लेडने वार केले. तसेच पुन्हा तक्रार करशील तर गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी देऊन ते दोघे फरार झाले.
बदलापूरमधील शिरगांव आपटेवाडीत राहणाऱ्या या तरुणीच्या शेजारी राहणारा विवाहित इसम किरण साजेकर तिला सातत्याने अश्लील एसएमएस पाठवीत होता. तसेच घराबाहेर पडल्यावर तिची छेड काढीत होता. या प्रकरणी या तरुणीने तीन दिवसांपूर्वीच पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास मोटार सायकलवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी या तरुणीच्या मानेवर ब्लेडने हल्ला केला. पुन्हा तक्रार न करण्याविषयी दम देऊन ते पळून गेले. जखमी तरुणीस तिच्या मैत्रिणीने रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पोलीस ठाण्यात दोन अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.
संग्रहित लेख, दिनांक 8th Mar 2013 रोजी प्रकाशित
छेडछाडीची तक्रार करणाऱ्या तरुणीवर बदलापूरमध्ये ब्लेडहल्ला
अश्लील एसएमएस पाठवून छेडछाड करणाऱ्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणाऱ्या बदलापूर येथील १९ वर्षीय तरुणीच्या मानेवर दोन अज्ञात इसमांनी मोटार सायकलवरून येऊन ब्लेडने वार केले. तसेच पुन्हा तक्रार करशील तर गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी देऊन ते दोघे फरार झाले.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 08-03-2013 at 02:14 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Girls injured in attack in badlapur