प्रत्येक वेळी काहीही चुकीचे घडले की, मुंब्य्राकडे बोट दाखवले जाते. मात्र हा विचार आता बदलण्याची गरज आहे. शासनाने यासाठी पुढाकार घेऊन मुंब््रयाला सुधारण्याची संधी मिळायला हवी, असे आवाहन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी रविवारी मुंब्रा येथे केले. ठरावीक वीज चोरांमुळे सर्वच मुंब्रावासीयांवर विजेचे भारनियमन लादणे योग्य नाही. या परिसरातील भारनियमन दोन महिने बंद करा, अशी सूचनाही पवारांनी यावेळी केली. येत्या दोन महिन्यांत मुंब्रा भागातील वीज चोरी कमी झाली नाही, तर राज्य शासनाने योग्य तो निर्णय घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कळवा तसेच मुंब्रा भागातील वेगवेगळ्या नागरी विकासकामांचे लोकार्पण, भविष्यातील प्रकल्पांचे भूमिपूजन, शहीद मनीष पितांबरे स्मृतिप्रीत्यर्थ संघर्ष संस्थेला मिळालेला रणगाडा आदींचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. मुंब्रा तसेच कळवा रेल्वे स्थानक परिसरात महापालिकेने केलेल्या कामांचा लोकार्पण सोहळाही यावेळी पवार यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी पवार यांनी मुंब्रा ते कळवा असा प्रवास रेल्वेने केला.  यावेळी पवार यांच्या मुंब्रा, कौसा भागात दोन सभा झाल्या. त्यावेळी ते बोलत होते. मुंब्रा विभागाचा विकास पाहून माझ्या डोळ्यांवर विश्वास बसेनासा झाला आहे. काही लोकांनी जाणीवपूर्वक मुंब्य्राला बदनाम केले आहे. आता मात्र मुंब्रा बदलतो आहे. अशीच प्रगती सुरू राहिली तर भविष्यात मुंब्रा, कौसा आणि कळवा या भागात सुख, शांती आणि भाईचारा नांदेल असे ते म्हणाले.

मुंब्रा येथील इशरत जहाँ या तरुणीचा गुजरातमध्ये एन्काऊंटर झाल्यानंतर मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी मुंबई तसेच दिल्ली पोलिसांना जे जमले नाही, ते आम्ही केले, असे सांगितले होते. मात्र आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सातत्याने पाठपुरावा करून इशरतच्या कुटुंबियांना न्याय मिळवून दिला, असेही पवार यावेळी म्हणाले. ‘नजर बदला, शहर बदलेल’ अशा आशयाचे फलक कळवा, मुंब्रा परिसरांत जागोजागी लावण्यात आले आहेत. या फलकांचा उल्लेख करत पवार यांनी फलकांवर लिहिलेल्या संदेशाचा यावेळी समाचार घेतला. प्रत्येक वेळी काही चुकीचे घडले की, मुंब््रयाकडे बोट दाखवले जाते. मात्र हा विचार आता बदलण्याची गरज आहे. मुळात शासनानेच हा विचार बदलायला हवा, नागरिकांनी नाही असेही त्यांनी सांगितले.

मी शेतकरी असून कृषी खात्याचे नेतृत्व करतो, त्यामुळे मुंब्रा-कौसा तसेच कळवा या विभागात स्लॉटर मॉडर्न हाऊस, मासळी बाजार उभारण्याच्या दृष्टिकोनातून मदत करू शकेन. तसेच राज्याचे अर्थ खाते राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे, त्यामुळे मुंब्रा भागात इस्लामिक कल्चर सेंटर उभारण्यासाठी अर्थ खात्यामार्फत निधी देण्यात येईल.

कौसा येथील भाषणामध्ये एका वक्त्याने आमदार जितेंद्र आव्हाड यांना मंत्री देण्याची शिफारस केली होती, त्याचाही  पवार यांनी खरपूस समाचार घेत चांगली वेळ आल्यावर शिफारस करण्याची गरज नसते, ते त्यावेळी आपोआपच मिळते, असे त्यांनी सांगितले.

शिवसेनेला मुंब््रयाचा विकास अमान्य -परांजपे

मी ज्या पक्षात होतो, त्या पक्षाने मला मुंब्रा विभागाचा विकास करू नको, असे सांगितले होते. त्यामुळे मी शरद पवार आणि आमदार आव्हाड यांची भेट घेऊन त्यांच्या नेतृत्वाखाली या विभागाचा विकास सुरू केला, असा आरोप खासदार आनंद परांजपे यांनी कौसा येथील भाषणात केला.