मुंबई : ‘‘तुम्ही घरी जा, स्वयंपाक करा. दिल्लीत जा, नाही तर मसणात जा’’, असे बेताल विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना उद्देशून केले. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. ‘‘दिल्लीत कोणाच्या बैठका झाल्यानंतर मध्य प्रदेशात ओबीसी आरक्षण देण्याबाबतचा निकाल लागला’’, असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी केला होता. तसेच दिल्लीत गेल्यावर केंद्र सरकारला याबाबत प्रश्न विचारणार असल्याचे सुळे यांनी म्हटले होते. याबाबत माध्यमांनी चंद्रकांत पाटील यांना विचारले असता, त्यांनी हे वादग्रस्त विधान केल़े  तसेच ‘‘तुम्हाला मसण माहिती आहे ना’’, अशी विचारणाही पाटील यांनी यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींना केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा