श्रीशांतच्या डायरीतील गूढ वाक्य
‘गॉड, प्लीज हेल्प मी’.. हे वाक्य आहे क्रि केटपटू श्रीशांत याच्या डायरीतील. मुंबई पोलिसांनी जप्त केलेल्या श्रीशांत याच्या डायरीत पोलिसांना अनेक ठिकाणी हे वाक्य लिहिलेले पोलिसांना आढळले आहे. जानेवारी २०१३ पासून अनेक ठिकाणी श्रीशांतने हे वाक्य एका देवस्थानाच्या डायरीत लिहिलेले आहे.याशिवाय श्रीशांतच्या आयपॅडमधून पोलिसांना दीड हजार भ्रमणध्वनी क्रमांक सापडले असून त्यात हवाई सुंदरी, कॉर्पोरेटस, मॉडेल्स आणि महाविद्यालयीन तरुणींचा समावेश आहे.
मुंबई पोलिसांनी श्रीशांत याचा लॅपटॉप, आयपॅड, ब्लॅकबेरी भ्रमणध्वनी आणि तीन डायऱ्या जप्त केल्या आहेत. पण पोलिसांना श्रीशांतच्या डायरीचे गूढ वाटत आहे. त्याच्याकडून जप्त केलेल्या तीन डायऱ्यांपैकी एक डायरी ही देवस्थानाची आहे. त्यात पहिल्याच पानावर त्याने मोठय़ा अक्षरात ‘गॉड, प्लीज हेल्प मी’ असे इंग्रजीत लिहिले आहे. प्रत्येक पानावर त्याने फक्त त्याचे नाव रांगेत लिहिले आहे. गॉड प्लीज हेल्प मी असे मधे मधे लिहिले आहे. एप्रिल पर्यत त्याने या डायरीत असे वाक्य लिहिल्याचे आढळले आहे. जानेवारी महिन्यात त्याला ‘गॉड,प्ल्ीाज हेल्प मी’ असे लिहावेसे का वाटले त्याबाबत पोलिसांना आश्चर्य वाटत आहे.
श्रीशांतचा लॅपटॉप हा अॅपल कंपनीचा असून त्याचा डेटा तपासण्याचे काम सुरू आहे. त्याच्या या लॅपटॉपमध्ये पोलिसांना अनेक छायाचित्रे मिळाली आहेत. अनेक मॉडेल्स आणि तरुणींसोबतची ही छायाचित्रे असल्याचे पोलिसांनी सांगितले. ती खाजगी असल्याने अश्लील आहेत का ते ठरविता येणार नसल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्या आयपॅडमध्ये पोलिसांना मिळालेल्या पंधराशे भ्रमणध्वनीपैकी चारशेहून अधिक क्रमांक हे तरुणींचे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
त्यात हवाई सुंदरी आणि महाविद्यालयीन तरुणींचा समावेश आहे. या प्रत्येक क्रमांकापुढे त्याने काही सांकेतिक नावे लिहिली होती. श्रीशांत हा छंदीफंदी असून त्याला मुलींचा नाद असल्याचे यानिमित्ताने उघड होत असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. त्याच्या ब्लॅकबेरी भ्रमणध्वनी मधील डेटाही मुंबई पोलिसांनी स्कॅन केला असून त्याच काही आक्षेपार्ह सापडले नाही. आम्ही पुरावे गोळा करत असून त्यानंतरच बुकी आणि श्रीशांतचा ताबा मागितला जाईल असे पोलिसांनी स्पष्ट केले.
श्रीसंतच्या आयपॅडमध्ये पोलिसांना मिळालेल्या पंधराशे भ्रमणध्वनीपैकी चारशेहून अधिक क्रमांक हे तरुणींचे असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यात हवाई सुंदरी आणि महाविद्यालयीन तरुणींचा समावेश आहे. या प्रत्येक क्रमांकापुढे त्याने काही सांकेतिक नावे लिहिली होती. श्रीशांत हा छंदीफंदी असून त्याला मुलींचा नाद असल्याचे यानिमित्ताने उघड  झाली आहे

Story img Loader