प्रतिमा तसेच मूर्तीना नेसवण्यात येणाऱ्या तयार साडय़ांचा व्यवसाय तेजीत

नवरात्रोत्सव म्हणजे देवीचा सण. अंबा, दुर्गा, भवानी, चंडिका, काली, अन्नपूर्णा, सर्वमंगला, ललिता, मुखांबिका अशा विविध नावांनी ओळखल्या जाणाऱ्या देवीच्या नऊ रूपांचे प्रतीक असलेल्या या नवरात्रीत देवीच्या विविध रूपांना साजेशी वेशभूषा करण्याला विशेष महत्त्व आहे. यासाठीच आता देवीच्या ‘रेडी टू वेअर’ साडय़ांची मागणी वाढत चालली असून देवीच्या प्रतिमांसह मोठमोठय़ा आकारांच्या मूर्तीना नेसवता येतील, अशा तयार साडय़ा बाजारात उपलब्ध झाल्या आहेत.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
Buldhana ST, ST benefits , maharashtra Assembly elections ,
बुलढाणा : निवडणुकीमुळे एसटी महामंडळाचेही चांगभलं, तब्बल पाऊण कोटीचा…
Tula Shikvin Changalach Dhada akshara is pregnant
अक्षराच्या प्रेग्नन्सीबद्दल अधिपती अनभिज्ञ! भुवनेश्वरी खेळणार मोठा डाव…; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत पुढे काय घडणार?
Fair Play Betting App, IPL Broadcast , ED ,
फेअर प्ले बेटिंग अ‍ॅप आयपीएल बेकायदा प्रक्षेपण प्रकरण: ईडीकडून आतापर्यंत ३३५ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच
Loksatta Chatura How to plan a New Year 2024 party at home
चतुरा: घरीच करा न्यू ईयर पार्टीची धम्माल
Mooli ka raita recipe how to make muli ka raita mulyachi koshimbir recipe in marathi
हिवाळ्यात हा चटकदार पदार्थ खायलाच हवा, जेवण होईल चवदार; मुळ्याचे रायते कसे करायचे जाणून घ्या
Nagpur people excited about New Year house party
नववर्षाच्या ‘हाऊस पार्टी’ची नागपूरकरांना हौस…

दादरच्या रानडे रोडवर गेली ७५ वष्रे साडय़ांचा व्यवसाय करणाऱ्या ‘साडीघर’मध्ये देवीच्या प्रतिमांसाठी खास पद्धतीच्या ‘रेडी टू वेअर’ सहावारी आणि नऊवारी साडय़ा उपलब्ध आहेत. नवरात्रीत घरात बसवल्या जाणाऱ्या घटांपासून ते मंडळांच्या बारा-तेरा फुटांच्या देवीच्या मूर्तीना नेसविता येतील अशा साडय़ांना या काळात मागणी असते, असे साडीघरचे गौतम राऊत यांनी सांगितले. घटांसाठी कोल्हापूरच्या ‘महालक्ष्मी’प्रमाणे निऱ्यांचा आडवा पट्टा गौतम यांनी तयार केला आहे. हा पट्टा काठीच्या साहाय्याने सहज घटाला लावून देवीला साज चढवू शकतो.

सार्वजनिक मंडळांच्या देवीच्या बसलेल्या आणि उभ्या अशा भव्य प्रतिमांचा विचार करता नऊवारी आणि सहावारी ‘रेडी टू वेअर’ अशा साडय़ा त्यांनी बनवल्या आहेत. बारा ते तेरा फुटांच्या देवीच्या उभ्या मूर्तीना पुरतील अशा साडय़ा बाजारात उपलब्ध नसतात. म्हणून या साडय़ा शिवून घेतल्या जातात. सिंहारूढ वा सिंहासनावर बसलेल्या मूर्तीनाही साडी नेसविता येत नाही. त्यांनाही या शिवलेल्या तयार साडय़ा नेसविता येतात. ३५० ते चार हजार रुपयांपर्यंत या साडय़ा उपलब्ध आहेत.

विशेष म्हणजे अगदी चार ते पाच इंचाच्या मूर्तिकरिताही या तयार साडय़ा उपलब्ध आहेत. भक्तांच्या सोयीनुसार आणि मागणीनुसार जानेवारीपासून ‘साडीघर’सारखे दुकानदार साडय़ांची कामे घेतात. यात नऊ रंगानुसार परिधान करता येतील अशा साडय़ांनाही मागणी असते. मराठी संस्कृतीप्रमाणे गुजराती व बंगाल्यांमध्येही नवरात्रीत मूर्ती पूजेला महत्त्व असते. म्हणून त्यांच्या गरजेनुसार आणि मागणीनुसारही साडय़ा दिल्या जातात. गौतम राऊत कामाठीपुऱ्यातील नवरात्रोत्सव मंडळाच्या देवीला बंगाली पद्धतीची साडी नेसवायला जातात.

फॅशननुसार साडी

नवरात्रीत बहुतांश मंडळे सहावारी पद्धतीचीच साडी देवीला नेसवितात. वडाळ्याच्या लता ठाकूर या गेली १५ वष्रे वडाळ्याच्या सार्वजनिक आणि गावदेवीला साडी नेसवण्याचे काम करत आहेत. सहावारीमध्येच आगरी, ब्राह्मणी, पेशवाई अशा मराठी तसेच गुजराती, बंगाली अशा विविध संस्कृतीनुसार साडी नेसविली जाते. काही ठिकाणी राजस्थानी महिलांप्रमाणे घागरा-चोळीही देवीला नेसविली जाते. इतकेच नव्हे तर त्या-त्या काळातील साडय़ांची फॅशनही यात उतरते. ‘चन्नई एक्स्प्रेस’ चित्रपट प्रसिद्ध झाल्यानंतर फॅशन जगतात चलती असलेली दक्षिण भारतीय सोनेरी काठाची पांढरी साडी ठाकूर यांनी देवीला नेसवली होती.

 

आभूषणांना मागणी

देवीला अलंकारित करण्यासाठी हलक्या आणि स्वस्त अशा आभूषणांनाही बाजारात मोठी मागणी आहे. एखाद्या मोठय़ा दुकानात दोन हजार रुपयांपर्यंत मिळणारी ठुशी रस्त्यावर सहज ७०० ते ८०० रुपयांना उपलब्ध होते. दादरच्या पदपथावर असे दागिने घडवून विकणाऱ्या कारागिरांना सध्या चांगली मागणी आहे. तसेच ‘इमिटेशन’ प्रकारच्या दागिन्यांचा पर्यायही बाजारात उपलब्ध आहे.

Story img Loader