ग्राहकांसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. उद्यापासून गोकुळचे गाईचे दूध दोन रुपयांनी स्वस्त होणार आहे. कोल्हापुरात गोकुळच्या गाईच्या दूधाची खरेदी २३ रुपयाने होणार आहे. २१ जूनपासून नवीन दरांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

एबीपी माझा वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार मुंबईत गोकुळचे गाईचे प्रतिलिटर दूधाचे दर ४४ रुपये आहेत. आता उद्यापासून हे दूध ४२ रुपयांना मिळणार आहे. गोकूळ दूध संघाने दरात दोन रुपयांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

गोकुळकडून दररोज साडेचार लाख लिटर दूध संकलित केले जाते. पण जेवढे दूध संकलित केले जाते त्याप्रमाणात विक्री होत नसल्याने दर कपातीचा निर्णय घेतला आहे. गोकुळची मुख्य बाजापेठ मुंबई आहे.