आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याच्या दरात शुक्रवारी रात्री घसरण झाल्यानंतर त्याचे पडसाद शनिवारी भारतीय बाजारपेठेत उमटले. सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही घसरण झाली असली, तरी सोन्याच्या तुलनेत ही घसरण कमी आहे. वायदे बाजारात चांदीचा भाव प्रतिकिलो ४८ हजार ९०० रुपये तर सोन्याचा भाव दहा ग्रॅमसाठी २८ हजार रुपयांवरून २७ हजार ६८० इतका झाला आहे.
मुंबईत शनिवारी सराफ बाजार बंद झाला तेव्हा सोने आणि चांदीचा भाव अनुक्रमे २७ हजार ८८० आणि ५० हजार ६०५ असा राहिला. शुक्रवारी सोने आणि चांदीचा भाव अनुक्रमे २८ हजार ८९० व ५२ हजार ९४५ रुपये असा होता. गेल्या काही महिन्यांपासून सोन्याचा भाव २९ ते ३० हजार रुपयांपर्यंत राहिला होता. गेल्या काही महिन्यांमध्ये सोन्याच्या दरात झालेली ही सगळ्यात मोठी घसरण आहे.
सोने हजाराने स्वस्त!
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याच्या दरात शुक्रवारी रात्री घसरण झाल्यानंतर त्याचे पडसाद शनिवारी भारतीय बाजारपेठेत उमटले. सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही घसरण झाली असली, तरी सोन्याच्या तुलनेत ही घसरण कमी आहे.
First published on: 14-04-2013 at 04:00 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gold cheap by thousand