बोरिवली येथील एक सराफाच्या दुकानात गुरुवारी भरदुपारी सव्वा कोटीचे दागिने लुटण्याची घटना घडली. चोरटय़ांनी चॉपरच्या साहाय्याने सराफाला मारहाण करून ही लूट केली. किरण बोराणा (४०) यांचे बोरिवली पूर्वेच्या कार्टर रोड येथे राज ज्वेलर्स हे सराफाचे दुकान आहे.
गुरुवारी दुपारी साडेतीन वाजता एक इसम त्यांच्या दुकानात दागिने बघण्यासाठी आला. दुकानात एकटेच असलेल्या बोराणांशी तो गुजरातीमधून बोलत होता. त्याच वेळी आणखी दोघे दुकानात आले. त्यानंतर या तिघांनी बोराणा यांना चॉपरचा धाक दाखवत दुकानातील सोन्या-चांदीचे सव्वा कोटी रुपयांचे चार किलो दागिने लंपास
केले.
लुटारू पळत असताना बोराणा यांनी आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला तेव्हा चोरटय़ांनी त्यांच्यावर चॉपरने हल्ला केला.
बोराणा यांच्यावर बोरिवलीच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते. त्यामुळे बोराणा यांनी दिलेल्या वर्णनावरून कस्तुरबा मार्ग पोलिसांनी तिन्ही संशयितांची रेखाचित्रे बनवली असून त्यांचा शोध सुरू केला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा