मुंबई : सीमा शुल्क विभागाने सोन्याच्या तस्करी प्रकरणी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुधवारी केलेल्या कारवाईत सुदानमधील दोन नागरिकांसह एकूण तिघांना अटक केली. आरोपींनी सोन्याच्या तस्करीसाठी विशेष कोट शिवून घेतला होता. त्यांच्याकडून सुमारे १० किलो सोने जप्त करण्यात आले असून त्याची किंमत सव्वापाच कोटी रुपये असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली. आरोपींविरोधात सीमाशुल्क कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> लटके यांचा दोनदा राजीनामा ; राजीनाम्याचा घोळ मर्जीतील उमेदवारासाठी ; भाजपचा आरोप

मोहम्मद हसन सुमेदा (४४) हा भारतीय प्रवाशाने विमानतळावरील ग्रीन चॅनल ओलांडल्यानंतर त्याला बुधवारी सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. आरोपी दुबईवरून भारतात आला होता. त्याची झडती घेतली असता त्याने कपड्याच्या आत विशेष कोट घातल्याचे सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. त्याला नऊ पाकीटे होती. त्याची तपासणी केली असता सोन्याच्या ११ लगडी सापडल्या. त्यात नऊ पूर्ण (एक किलो वजनाचे), एक अर्धे (५०० ग्रॅम वजनाचे) व एक सुमारे ४०० ग्रॅमची लगड असल्याचे निष्पन्न झाले. सुमेदाकडून एकूण ९८९५ किलो वजनाचे सोने हस्तगत करण्यात आले. त्याची किंमत पाच कोटी २० लाख ४७ हजार रुपये असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा >>> “संजय राऊत मला भेटतात तेव्हा दोनच प्रश्न विचारतात ते म्हणजे…”, भाऊ सुनिल राऊतांची भावनिक प्रतिक्रिया

सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुमेदाची चौकशी केली असता सुदानमधील दोन नागरिकांनी त्याला सोने तस्करीसाठी दिल्याचे सांगितले. दोघेही त्याच्याच विमानातून भारतात आले होते. अखेर सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी मोठ्या शिताफीने या दोघांना ताब्यात घेतले. मन्सूर अहमद सिद्दीग इस्मुकश्फी (४४) व मोहम्मद सलीह अलशेख गोब्रान इल्टेल्ब (४१) अशी त्यांची नावे आहेत. दोघेही सुदानमधील खारटोम येथील रहिवासी आहेत. याप्रकरणी त्यांनाही अटक करण्यात आली. सीमाशुल्क कायद्याअंतर्गत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सुमेदाकडून सोने घेऊन ते भारतात एका व्यक्तीला देणार होते. त्याबाबत सीमाशुल्क तपास करीत आहेत. या प्रकरणामागे आंतरराष्ट्रीय टोळी असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. आरोपींनी सोन्याच्या तस्करीसाठी विशेष कोट शिवून घेतल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gold seized at mumbai airport two sudanese nationals arrested mumbai print news zws