महिला सन्मान योजना आणि अमृत ज्येष्ठ योजनेमुळे एसटीमध्ये प्रवासीसंख्या वाढली. आता असाच निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई मेट्रोसाठी घेतला आहे. मुंबई मेट्रोमधून आता ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि विद्यार्थ्यांना तिकिटदरांत २५ टक्के सवलत मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करू संबंधित माहिती दिली. १ मे, म्हणजेच महाराष्ट्र दिनापासून या सवलतीचा लाभ घेता येणार आहे.

कोणाला मिळणार लाभ?

ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात प्रवास करता येणार आहे. नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (मुंबई वन) वापरणाऱ्या हजारो प्रवाशांना या सवलतीचा लाभ घेता येणार आहे. महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड आणि एमएमआरडीए यांच्याकडून महाराष्ट्र दिनाची ही भेट मिळाली आहे. ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि दिव्यांग प्रवाशांना ४५ किंवा ६० ट्रिपसाठी मुंबई वन पासवर ही सवलत मिळणार आहे.

Yogi Adityanath who made the statement Batenge to Katenge now has a different slogan Pune news
‘बटेंगे तो कटेंगे’ असे वक्तव्य करणारे याेगी आदित्यनाथ यांचा आता ‘हा’ नारा
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
CM Siddaramaiah, CM Siddaramaiah Solapur,
मोदींची सत्ता गेल्यावरच देशात ‘अच्छे दिन’ – सिद्धरामय्या
Eknath Shinde, Vijay Shivtare, Purandar Haveli,
पुरंदर विमानतळ ‘असा’ उभारणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा ! विजय शिवतारे यांच्या प्रचारार्थ घेतली सभा
loksatta readers feedback
पडसाद : मनात डोकावून पाहायला लावणारे भाषण
Rahul Gandhi ashok chavan nanded
नांदेडमध्ये राहुल गांधींकडून चव्हाण कुटुंबिय बेदखल !
Deputy Chief Minister Devendra Fadnavis announced that will waive off the loans of farmers after mahayuti govt
“शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू”, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Rajshree Ahirrao, Devalali, Mahayuti Devalali,
नाशिक : देवळालीत महायुतीतील मतभेद मिटता मिटेना, अजित पवार गटाविरोधात शिंदे गटाचा प्रचार

मुख्यमंत्री काय म्हणाले?

मुंबई मेट्रोच्या नव्या सवलतीविषयी माहिती देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि लहान मुलांच्या गरजा आणि सुरक्षितता लक्षात घेऊन आम्ही मुंबई मेट्रो नेटवर्क तयार केले आहे. त्यामुळे त्यांना या सुविधांचा जास्तीत जास्त लाभ मिळणे आवश्यक आहे. आम्ही यापूर्वी ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवास मोफत केला आहे तर महिलांना सुद्धा एसटी बसेसमधून ५० टक्के प्रवास सवलत दिली आहे. सामाजिक भावनेतून हे निर्णय आम्ही घेतले असून मेट्रो प्रवासातील या सवलतीमुळे देखील अधिक संख्येने लोक यातून प्रवास करतील असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

ही कागदपत्रे द्यावी लागणार

६५ वर्षांवरील वरिष्ठ नागरिक, इयत्ता १२ वीपर्यंत शिकणारे विद्यार्थी आणि कायमस्वरूपी दिव्यांग लोकांसाठी ही सवलत आहे.या तीन श्रेणीतील प्रवाशांना सवलतीसाठी काही कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. दिव्यांगांसाठी सरकारी/वैद्यकीय संघटनेचे प्रमाणपत्र, ज्येष्ठ नागरिकांसाठी वयाचा पुरावा आ विद्यार्थ्यांसाठी पॅन (विद्यार्थी किंवा पालक पॅन) सोबत शाळा ओळखपत्र यासारखी वैध कागदपत्रे आवश्यक आहेत.

येथे मिळणार सवलत

या सर्व सवलती मेट्रो लाइन २ ए आणि ७ च्या मेट्रो स्टेशनवरील कोणत्याही तिकीट खिडकीत आवश्यक कागदपत्र दिल्यावर मिळू शकतील. नवीन आणि पूर्वी खरेदी केलेल्या मुंबई-1 कार्डवर देखील सवलत असेल तसेच याला ३० दिवसांची वैधता असेल. मुंबई 1 कार्ड रिटेल स्टोअर, पेट्रोल पंप आणि बेस्ट बस प्रवासादरम्यान देखील वापरले जाऊ शकते व रिचार्जही करता येते.