मुंबई : वरळी बीडीडी चाळीतील १८ आणि नायगाव बीडीडी चाळीमधील ४४२ पात्र रहिवाशांना सोमवारी म्हाडाच्या मुंबई मंडळाने प्रस्तावित पुनर्वसन इमारतीतील कायमस्वरूपी घराची हमी दिली. म्हाडा भवनातील गुलझारीलाल नंदा सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाइन सोडतीद्वारे प्रस्तावित पुनर्वसन इमारतीतील सदनिका क्रमांक, इमारत क्रमांक, मजला आदींची निश्चिती करण्यात आली.
हेही वाचा >>> Mumbai Water Cut : निम्म्या मुंबईत आज पाणी नाही
नायगाव बीडीडी चाळीतील १२ बी, १३ बी, १४ बी, १५ बी, १६ बी, १९ बी , २२ बी या इमारतींमधील ४४२ पात्र रहिवासी आणि वरळी बीडीडी चाळ प्रकल्पातील सावली इमारतीतील १८ पात्र रहिवाशांना कायमस्वरूपी घराची हमी देण्यात आली आहे. या रहिवाशांची यादी म्हाडाच्या https://mhada.gov.in वर लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे.