बुधवार, २४ सप्टेंबर २०१४ रोजी भारतीय शास्त्रज्ञांनी एक ऐतिहासिक कामगिरी केली. पहिल्याच प्रयत्नात मंगळावर यशस्वीरीत्या स्वारी करून भारताने अंतराळयुगाच्या इतिहासात सोनेरी अक्षरांनी लिहिला जाणाऱ्या या ऐतिहासिक क्षणाचा थरार साऱ्या भारतानेच नव्हे तर जगाने अनुभवला. आज शुक्रवार, २४ ऑक्टोबर २०१४ रोजी या घटनेला एक महिना पूर्ण झाला आणि भारताच्या या मोहिमेवर जगाचे कसे लक्ष आहे, हे दाखवून देणारा प्रत्यय ऑनलाईन जगतात सर्वांना येत आहे. या घटनेची दखल घेत गुगलने खास ‘गुगल-डूडल’ तयार केले आहे. गुगलच्या सर्च (शोधा) पानावर ते दिसते आणि तेथून सोशल मिडियावर शेअर करण्याचा पर्यायही देण्यात आला आहे.
बरोब्बर एक महिन्यापूर्वी, म्हणजेच २४ सप्टेंबर २०१४ रोजी ७ वाजून १७ मिनिटे अन् ३४ सेकंद झाले आणि मंगळयानावरील लिक्विड अपोजी मोटर प्रज्वलित करण्याचा संदेश अचूक पाळला गेला. पाठोपाठ आठ छोटय़ा मोटारीही प्रज्वलित झाल्या. त्यानंतर अवघ्या दोन मिनिटांत रिव्हर्स रोटेशनने यानाचा अँटेना पृथ्वीच्या दिशेने वळवला गेला. सर्व काही अगदी ठरल्याप्रमाणे पार पडत होतं. ‘मॉम’ या भारतीय यानाकडून मंगळाच्या कक्षेत सुखरूप पोहोचल्याचा संदेश आला आणि भारताची ‘मंगळयान’ मोहिम फत्ते झाली.

Story img Loader