दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रभावी व्यक्तीमत्व म्हणून ओळख आहे. त्यामुळे ‘गुगल’ने ‘डुडल’च्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहावी, अशी मागणी शिवसेनेच्यावतीने करण्यात आली आहे.
शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी ‘गुगल’ला यासंदर्भात  पत्र पाठविले आहे. येत्या २३ जानेवारीला बाळासाहेबांच्या जयंतीदिनी ‘गुगल’ने ‘डुडल’च्या माध्यमातून त्यांना आदरांजली वाहण्याची मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे. तसेच केंद्रीय दूरसंचारमंत्री अरूण जेटली यांनाही यासंदर्भात लक्ष घालण्याची विनंती करण्यात आल्याचे शेवाळे यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Google should make doodle on balasaheb thackeray shevale