मुंबईः कुख्यात दाऊद इब्राहिम व छोटा शकील टोळीतील गुंडाला २९ वर्षानंतर अटक करण्यात ना. म. जोशी मार्ग पोलिसांना यश आले आहे. आरोपी १९९६ मध्ये हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात फरार होता. आरोपी सध्या कर्नाटकात ओळख बदलून वास्तव्याला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबईमधील अर्थर रोड कारागृहात १९९६ मध्ये दाऊद इब्राहिम टोळीतील गुंड व छोटा राजन टोळीतील गुंड न्यायालयीन कोठडीत होते. दोन्ही टोळ्यांमधील गुंडांनी कारागृहात हाणामारी करून परस्परांना ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. त्याप्रकरणी कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम, छोटा शकील टोळीच्या गुंडांविरोधात ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात भादंवि कलम १४३, १४७, १४८, १४९, ३२४, ३०७ कलमांतर्गत हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अटक आरोपी प्रकाश रतीलाल हिंगु (६३) त्यावेळी अंधेरी येथील जुहू लेन परिसरात राहत होता. याप्रकरणी जामीन मिळाल्यानंतर आरोपी न्यायालयीन प्रक्रियेसाठी गैरहजर राहू लागला. त्यानंतर न्यायालयाने आरोपीला फरार घोषित केले होते.

फरार आरोपी कर्नाटकमधील हुबळी येथे वास्तव्य असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ देशमाने व पथक हुबळीला रवाना झाले. तेथे त्यांनी फरार आरोपीचा शोध घेतला. पोलिसांनी ओळख पटताच आरोपीला ताब्यात घेतले. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला फेरअटक केली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Goon of underworld don dawood ibrahim gang arrested after 29 years mumbai print news css