Gopal Shetty : भाजपाचे बंडखोर नेते गोपाळ शेट्टी ( Gopal Shetty ) हे बोरीवलीतून अपक्ष लढवण्यार ठाम होते. मात्र आज अखेर त्यांनी माघार घेतली आहे. देवेंद्र फडणवीस यांची शिष्टाई यशस्वी ठरली आहे. किरीट सोमय्या आणि विनोद तावडे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर गोपाळ शेट्टींनी उमेदवारी मागे घेतली आहे. माझी लढाई विशिष्ट कार्यपद्धतीवर होती. कार्यकर्त्यांची काळजी पक्ष घेतो. मला अनेक नेते भेटायला आले. गोपाळ शेट्टी यांना काय करायचं ते करु दे अशी भूमिका पक्षाने घेतली नाही. त्यामुळे मी माघार घेतो आहे असं गोपाळ शेट्टींनी ( Gopal Shetty ) जाहीर केलं. बोरीवलीत भाजपाने संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिली. त्यानंतर गोपाळ शेट्टींनी बंड करत काहीही झालं तरीही निवडणूक लढणारच असं म्हटलं होतं. मात्र आज ४ नोव्हेंबरला अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे त्या दिवशी त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे.
Gopal Shetty : गोपाळ शेट्टींची माघार, देवेंद्र फडणवीस यांची शिष्टाई यशस्वी, बोरीवलीतलं बंड शमवण्यात भाजपाला यश
बोरीवलीतलं भाजपातलं बंड शमवण्यात विनोद तावडे यांनी पुढाकार घेतला असं दिसून आलं. आता गोपाळशेट्टींनी या मतदारसंघातून माघार घेतली आहे.
Written by पॉलिटिकल न्यूज डेस्क
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 04-11-2024 at 10:52 IST
© IE Online Media Services (P) Ltd
© IE Online Media Services (P) Ltd
TOPICSदेवेंद्र फडणवीसDevendra Fadnavisभारतीय जनता पार्टीBJPमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Maharashtra Vidhan Sabha Election 2024विधानसभा निवडणूक २०२४Assembly Election 2024
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gopal shetty withdraws from maharashtra assembly polls announces no contest as independent scj