विधान परिषदेच्या निवडणुकीवरून राजकारणाचा पारा चढला आहे. एकीकडे महाविकासआघाडीचे नेते आपल्या सर्व जागा निवडून येणार असल्याचा दावा करत आहेत, तर दुसरीकडे राज्यसभेप्रमाणे विधान परिषदेतही आमचेच सर्व उमेदवार निवडून येणार असा दावा भाजपाकडून होतोय. अशातच भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज कुणीही पावसात भिजलं तरी निवडणुकीवर परिणाम होणार नाही, असं म्हणत थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना टोला लगावला. ते सोमवारी (२० जून) मतदानानंतर विधीमंडळ परिसरात पत्रकारांशी बोलत होते.

गोपीचंद पडळकर म्हणाले, “विधान परिषद निवडणुकीत भाजपाचे सर्व पाच उमेदवार निवडून येणार आहेत. आज कुणीही पावसात भिजलं तरी त्याचा निवडणुकीवर काही परिणाम होणार नाही.”

Uddhav Thackeray on PM Narendra Modi
“आधी मणिपूर ‘सेफ’ करा आणि मग…”; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मोदी सरकारवर टीकास्र!
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
sharad pawar rain speech
Sharad Pawar: “मी बोलायला लागलो की पाऊस येतो आणि निकाल…”, शरद पवारांचं सूचक विधान; पावसातल्या ‘त्या’ सभेची पुन्हा चर्चा!
Devendra Fadnavis rally in rains
Devendra Fadnavis: शिराळा येथे देवेंद्र फडणवीस यांचे भरपावसात भाषण; म्हणाले, “पावसात सभा झाली की…”
uddhav Thackeray sawantwadi
“कोकण आणि शिवसेनेचे नाते तोडण्याचा प्रयत्न, कोकणचे अदानीकरण होऊ देणार नाही”, उद्धव ठाकरेंचा इशारा
Marathi Actors Akshay Kelkar First Reaction after announced abeer gulal serial will off air
‘अबीर गुलाल’ मालिका बंद होणार असल्याचं कळताच अक्षय केळकरला बसला धक्का, म्हणाला, “मला पुन्हा स्ट्रगल…”
ravi rana replied to ajit pawar
“…तेव्हा ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ आठवली नाही का? आता परिणाम भोगा”; रवी राणांचं अजित पवारांना प्रत्युत्तर!

“राज्यात २०१९ च्या विश्वासघातानंतर पहिल्यांदा आमदारांना मत व्यक्त करण्याची योग्य संधी”

“भाजपा लोकशाहीवर विश्वास ठेवणारा पक्ष आहे. त्यामुळे या राज्यात २०१९ चा जो विश्वासघात झाला, जनतेने दिलेल्या कौलाच्या पाठीत खंजीर खुपसून सरकार स्थापन करण्यात आलं. परंतू आमदारांना पहिल्यांदा त्यांचं मत व्यक्त करण्याची योग्य संधी आली आहे,” असं मत गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केलं.

“लोकांनी युतीचं सरकार येण्यासाठी १६१ आमदार युतीचे निवडून दिले होते”

गोपीचंद पडळकर पुढे म्हणाले, “ज्या लोकांमधून हे आमदार निवडून आले आहेत त्या लोकांनी युतीचं सरकार येण्यासाठी १६१ आमदार युतीचे निवडून दिले होते. त्यामुळे आज हे सर्व आमदार मतदानातून व्यक्त होतील.”

“अपक्ष आमदारांची मविआने अनेकदा अब्रू घालवली”

“अपक्ष आमदारांची मविआने अनेकदा अब्रू घालवली. ते लोकांमधून निवडून आले आहेत. त्यांच्या विश्वासार्हतेवर यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले. लोकांमध्ये या आमदारांविषयी मत कलुषित करण्याचा प्रयत्न झाला आहे. ते सर्व आमदार आजच्या दिवशी मतदानातून नक्कीच व्यक्त होतील,” असंही पडळकरांनी नमूद केलं.

हेही वाचा : “अशा लोकांना मी विकृत राजकीय…”, रुपाली पाटलांची गोपीचंद पडळकरांवर जहरी टीका

“१७० आमदारांवाले पहाटेपर्यंत कशासाठी जागे आहेत?”

भाजपाचे काही आमदार आपल्या संपर्कात असल्याच्या एकनाथ खडसे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना गोपीचंद पडळकर म्हणाले, “१७० आमदार असणाऱ्यांची बैठक पहाटे संपल्याचं माध्यमातून ऐकलं. भाजपाची बैठक रात्री साडेआठ वाजताच संपली. १७० आमदारांवाले पहाटेपर्यंत कशासाठी जागे आहेत? म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात येतंय की त्यांच्यात काहीतरी गोंधळ उडाला आहे.”