महाराष्ट्र विधानसभा आणि विधान परिषदेच्या दोन्ही सभागृहात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर केला असून त्यामध्ये विविध घोषणा केल्या आहेत. अर्थसंकल्पातील घोषणांवरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांमध्ये खडाजंगी पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी अर्थसंकल्पाला विरोध केला असून यातील घोषणा फसव्या असल्याचं म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान, भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी देवेंद्र फडणवीसांना सादर केलेल्या अर्थसंकल्पाचं स्वागत केलं आहे. यावेळी त्यांनी विरोधी पक्षावर जोरदार टीकास्र सोडलं आहे. गेल्या ४०-५० वर्षात महाराष्ट्रात एक नारदमुनी आहे.जेव्हा आमचं सरकार येतं, तेव्हा कळ लावण्याचा प्रयत्न हा नारदमुनी करतो, अशा आशयाची टीका गोपीचंद पडळकरांनी केली. त्यांनी कुणाचंही नाव न घेता ही टीका केली आहे.

हेही वाचा- “शासकीय कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा आणि…”, एकनाथ शिंदेंचं संपकऱ्यांना आवाहन

गोपीचंद पडळकर विधान परिषदेत म्हणाले, “गेल्या ४०-५० वर्षांपासून महाराष्ट्रात एक नारदमुनी आहे. जेव्हा जेव्हा आमचं सरकार येतं, तेव्हा तेव्हा कळ कशी लावायची? यासाठी नारदमुनी नेहमी प्रयत्न करतो. पण आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांचं सरकार आहे. महाराष्ट्रातील गावगाड्यातील लोकांचा विचार करणारं संवेदनशील सरकार आहे. त्यामुळे तुम्ही कुठल्याही चुकीच्या पद्धतीने प्रयत्न केला, तरीसुद्धा हे सरकार लोकांशी बांधील सरकार आहे. प्रस्थापित व्यवस्थेला घाबरणारं हे सरकार नाही. बाप गेला की पोरगा, पोरगा गेला की नातू, यापलीकडे कधीही मुख्यमंत्रीपद आणि उपमुख्यमंत्रीपद जाऊ नये, असं यांना वाटतं.”

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gopichand padalkar speech in assembly council naradmuni rmm