मुंबई : राज्यातील सर्वात पहिले कांदळवन उद्यान दहिसर आणि गोराई येथे उभारण्यात येत असून या दोन्ही उद्यानांची कामे वेगात सुरू झाली आहेत. लवकरच मुंबईकरांना नैसर्गिक अधिवासात जाऊन निसर्गाचा आनंद घेता येणार आहे. राज्य सरकार, वन विभाग दोन्ही उद्यानांच्या कामाचा आढावा घेत असून प्रकल्पातील अडचणी दूर करण्यात येत आहेत. मुंबई महानगरपालिका दहिसर येथील कांदळवनाच्या पोहोच रस्त्याचा आराखडा तयार करणार आहे.

कांदळवनांचे संवर्धन आणि अन्न साखळीतील त्याचे महत्त्व नागरिकांना पटवून देण्याच्या उद्देशाने मुंबईतील ३८ हेक्टर क्षेत्रात कांदळवन उद्यानाची निर्मिती करण्यात येत आहे. गोराई येथे आठ हेक्टर क्षेत्रावर २६.९७ कोटी रुपये खर्च करून, तर दहिसर येथे ३० हेक्टर क्षेत्रावर ४८.८० कोटी रुपये खर्च करून कांदळवन उद्यान विकसित करण्यात येणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव २०१९-२० मध्ये मांडण्यात आला होता. सध्या गोराई येथील कांदळवन उद्यानाचे काम सुरू आहे. मात्र, दहिसरमधील कांदळवन उद्यानाच्या कामात काही अडचणी निर्माण झाल्या होत्या. या अडचणी सोडवून ऑगस्ट २०२२ मध्ये दहिसरमधील उद्यानाला सार्वजनिक बांधकाम विभागाची मान्यता मिळाली. तर, आता सहा महिन्यांमध्ये या उद्यानासाठी पोहच रस्ता तयार करण्यात येणार आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा >>> कफ परेड-मुंबई विमानतळ प्रीमियम बस सेवा सुरू

मानवी जीवन आणि नैसर्गिक जैवविविधता टिकून राहावी यासाठी कांदळवनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कांदळवनाचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन त्याची शास्त्रीय माहिती जनतेला मिळावी आणि त्यांच्या मनात कांदळवन परिसंस्थेबाबत आपुलकी निर्माण करण्यासाठी मुंबईत कांदळवन उद्यान उभे राहत आहे. दहिसर आणि गोराई येथे हे उद्यान उभे राहणार आहे. गोराईतील कांदळवन उद्यानाचे काम सुरू झाले आहे. दहिसर येथील कांदळवनला पोहोच रस्ता तयार करण्यासाठी महापालिकेने त्वरित आराखडा तयार करण्याच्या सूचना करण्यात आल्या असून याबाबत निविदा काढून काम सुरू करण्यात येणार आहे, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

Story img Loader