मुंबई : झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील गोरेगावमधील उन्नत नगर येथील ‘जय भवानी’ इमारत दुर्घटनेनंतर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाला जाग आली आहे. एकीकडे मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून झोपु योजनेतील सर्व इमारतींची अग्निसुरक्षा तपासणी करण्यात येणार आहे. तर, दुसरीकडे आगीची घटना घडल्यानंतर होणारी जीवितहानी टाळण्यासाठी झोपु योजनेतील सात मजल्यापर्यंतच्या इमारतींना अतिरिक्त लोखंडी जिने बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
या निर्णयाप्रमाणे सात मजल्यांपर्यंतच्या सुमारे २५० इमारतींना आपत्कालीन परिस्थितीत रहिवाशांना सुरक्षितरित्या बाहेर पडता यावे यासाठी अतिरिक्त लोखंडी जिने बसविण्यात येणार आहेत. मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी झोपु प्राधिकरणाच्या माध्यमातून झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करण्यात येते. आतापर्यंत सुमारे अडीच लाख झोपड्यांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे यातील बहुतांश इमारती सात मजल्यांपासून २०-२४ मजल्यापर्यंतच्या आहेत. महालक्ष्मी येथे झोपू योजनेअंतर्गत ४२ मजली इमारत नुकतीच उभारण्यात आली आहे. सातपेक्षा अधिक मजल्यांच्या उंच इमारतीत एकापेक्षा अधिक जिने असतात. तसेच अग्निरोधक यंत्रणा बसविण्यात आली आहे.
हेही वाचा >>> मुंबई : कोनमधील घरांच्या ताब्यासाठी आता दिवाळीचा मुहूर्त, अंदाजे ५०० विजेत्या गिरणी कामगारांना ताबा देण्याचे नियोजन
पण सात मजल्यापर्यंतच्या इमारतीत एकच जिना आहे. त्यामुळे आग किंवा इतर आपत्कालीन परिस्थितीत रहिवाशांना बाहेर पडणे कठीण होते. ‘जय भवानी’ इमारतीत एकच जिना असल्याने अनेक रहिवाशांना इमारती बाहेर पडता आले नाही. त्यामुळे झोपु प्राधिकरणाने आता आग किंवा इतर आपत्कालीन स्थितीत रहिवाशांना सुरक्षितरित्या बाहेर पडता यावे यासाठी इमारतींना बाहेरच्या बाजूने अतिरिक्त लोखंडी जिने बसविण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती झोपु प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे यांनी दिली.
घटनेच्या चौकशीसाठी विशेष समिती
गोरेगाव येथील भीषण आग दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी आठ सदस्यांची विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती चौकशी करून सात दिवसात अहवाल सादर करणार आहे. घटनेची चौकशी करण्यासाठी विशेष समिती नेमण्याचे व पंधरा दिवसात घटनेचा अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते.
१३ जण रुग्णालयातून घरी
गोरेगाव येथील उन्नत नगर परिसरातील ‘जय भवानी’ इमारतीला शुक्रवारी भीषण आग लागली. या आगीत एकूण सात जणांचा मृत्यू, तर, ६९ जण जखमी झाले. दरम्यान, रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलेल्या ३७ जणांपैकी १३ जणांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे त्यांना घरी पाठविण्यात आले. या दुर्घटनेत जखमी झालेल्या एकूण ६९ जणांपैकी सध्या विविध रुग्णालयांमध्ये २४ जण उपचार घेत आहेत.
लवकरच संरचनात्मक लेखापरीक्षण
‘जय भवानी’ इमारतीचे संरचनात्मक लेखापरीक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर, इमारतीची आठ दिवसांत दुरुस्ती करण्यात येणार आहे. दुरुस्ती आणि संरचनात्मक लेखापरीक्षणाची जबाबदारी विकासकावर सोपविण्यात आली आहे. झोपु योजनेतील चार ते साडेचार हजार इमारती असून महापालिकेच्या माध्यमातून या इमारतींची अग्निसुरक्षा तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती झोपु प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे यांनी दिली.