मुंबई : गोरेगावमधील सिद्धार्थ नगर येथील सदनिका खरेदी करण्याच्या नावाखाली सहा जणांची १७ कोटी ६८ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चार विकासकांसह सात जणांविरोधात गोरेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

कांदिवलीमधील अशोक नगरमध्ये वास्तव्यास असलेले तक्रारदार ईश्‍वरलाल वंजारा (६१) यांना एप्रिल २०१३ मध्ये एका दलालाने गोरेगावमधील प्रकल्पामध्ये गुंतवणुकीतून फायदा होईस अशी बतावणी केली होती. इमारतीचे बांधकाम २०१७ मध्ये पूर्ण करून सदनिकेचा ताबा देण्यात येईल, असे त्यांना सांगण्यात आले होते. सदनिकेसाठी त्यांनी दोन कोटी नऊ लाख रुपये भरले. त्या सदनिकेची नोंदणीही करण्यात आली. त्यासाठी त्यांना सुमारे ११ लाख रुपये खर्च आला होता. त्यांच्याप्रमाणे चेतन गांधी यांनी ३ कोटी ४६ लाख, जयेश चौधरी यांनी ४ कोटी १६ लाख, राकेश शहा यांनी २ कोटी ८१ लाख, विशाल बंधे यांनी ३ कोटी ३३ लाख आणि जितेंद्र जैन यांनी १ कोटी ७१ लाख असे १५ लाख ४८ लाख रुपये या प्रकल्पामधील सदनिकेसाठी भरले होते.

ATM money theft pune, thief caught pune,
पुणे : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पकडले; सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांची तत्परता
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Pune Loot, bikers robbed pune, pune crime news,
पुणे : शहरात लुटमारीचे प्रकार वाढीस, दुचाकीस्वार तरुणांना लुटले
minor boy stabbed his mother
कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू
life insurance fraud pune marathi news
पुणे: आयुर्विमा पॉलिसीच्या नावाखाली तरुणीची १३ लाखांची फसवणूक
Haryana for atm robbery pune
पुणे: एटीएम फोडून रोकड चोरणारी हरयाणातील टोळी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांची कामगिरी
Sadabhau Khot allegations
“…तेव्हा माझा एन्काऊंटर करण्याचा डाव होता”, सदाभाऊ खोत यांचा खळबळजनक आरोप!
6 feet long snake entered the MIDC police station
पोलीस ठाण्यात साप आणि पोलिसांची तारांबळ

हेही वाचा…धनगर समाजाने भाजपची साथ सोडली?

पण त्यांना अद्याप ताबा मिळालेला नाही. त्यामुळे याप्रकरणी गोरेगाव पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. याप्रकरणी पोलिासांनी ४०९, ४२०, ३४ भादवी सहकलम महाराष्ट्र ठेवीदाराच्या अधिनियम कायदा कलमांतर्गत सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.