History of Mumbai: मुंबईचे ग्रामदैवत असलेल्या मुंबादेवीचे मंदिर हे सध्या भुलेश्वर- काळबादेवी परिसरात आहे. मात्र हे मंदिर तत्कालीन मुंबई किल्ल्याच्या आतमध्ये उत्तर टोकास बोरी बंदराजवळ होते. मात्र त्या ठिकाणी बोरिबंदर (आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) रेल्वे स्थानक बांधण्याचा निर्णय झाल्यानंतर १९ व्या शतकाच्या अखेरीस ते विद्यमान जागी हलविण्यात आले.

या मंदिरामध्ये मुंबादेवी, अन्नपूर्णा आणि जगदंबा माता अशा तीन मूर्ती विराजमान आहेत. यातील मुंबादेवीचा थेट संबंध हा मूळ मुंबईकर असलेल्या आगरी- कोळी समाजाशी आहे. नवरात्रीमध्ये या देवीची विशेष राजोपचार पूजा केली जाते. मुंबादेवी वरून मुंबई या महानगराचा त्याचे नाव मिळाले असे मानले जाते. पण मग देवीला मुंबादेवी हे नाव कशावरून प्राप्त झाले? … हे समजून घ्यायचे असेल तर ‘गोष्ट मुंबईची’चा हा विशेष भाग पाहायलाच हवा!