प्राचीन भारतीय संस्कृतीचा इतिहास समजून घ्यायचा तर सध्या पाकिस्तानात असलेल्या मिरपूर खास पासून ते अफगाणिस्तानातील निमरणपर्यंतचा एक फेरफटका मारावा लागतो आणि महत्त्वाचे म्हणजे या फेरफटक्यासाठी आपल्याला ठाण्यातही यावे लागते… एरवी हा सारा प्रवास करायचा तर अनेक दिवस हवेत आणि विविध साधनांचा वापर करत प्रवास करावा लागेल. त्यात भरपूर दिवस जातील, ते वेगळेच! पण हा सारा प्रवास टाळून हा इतिहास याच मुंबईत समजून घेण्याची एक अनोखी संधी आता छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाने याच मुंबईत उपलब्ध करून दिली आहे. फक्त त्यासाठी तिथे सुरू असलेल्या प्राचीन शिल्प या प्रदर्शनास आपल्याला भेट द्यावी लागेल.
या प्रदर्शनसाठी आलेल्या प्राचीन शिल्पकृतींमध्ये विद्यमान पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातून आलेल्या शिल्पकृतींचा समावेश आहे. त्यात अफगाणिस्तानातील निमरण येथील स्तूपामध्ये सापडलेला सोनेरी करंडक आणि मिरपूर खासच्या स्तूपावर असलेल्या गांधार शैलीतील शिल्पकृतींचा समावेश आहे. सर्वाधिक लक्षवेधी आहे ती ठाणे जिल्ह्यात सापडलेली कलाकृती. ही कलाकृती म्हणजे एक शंकूच्या आकाराचे निधिशृंग आहे, ते नेमके कशासाठी वापरले जात होते, त्याचे महत्त्व काय हे जाणून घ्यायचे तर हा व्हिडिओ पाहायलाच हवा!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा