मुंबईच्या किनाऱ्यावरून जाणारा नवा मार्ग मरिन लाइन्सहून सुरू होत थेट विरार गाठणार आहे. भविष्यात तो थेट पालघर आणि वाढवण बंदरापर्यंत नेण्यात येणार आहे. याचा पहिला टप्पा आहे तो मरिन लाइन्स ते वरळी. तब्बल १४०० कोटी रूपये खर्च करून बांधण्यात आलेल्या १०.५८ किलोमीटर्सच्या या पहिल्या टप्प्याचा एक मोठा भाग चक्क मुंबईच्या पोटातून जातो. एरवी उपलब्ध मार्गाने हा टप्पा पार करायचा तर ४०मिनिटं ते एक तास किंवा त्याहूनही अधिक कालावधी लागतो. या नव्या मार्गाने मुंबईकरांचे श्रम आणि वेळ दोन्हींची बचत होणार आहे.

‘मावळा’ नावाच्या चार मजली इमारती एवढ्या उंचीच्या टीबीएम मशिनने या बोगद्याचे खणकाम केले. हा मार्ग दुहेरी असल्याने इथे दोन बोगदे आहेत. प्रत्येक बोगद्यात प्रत्येकी तीन अशा एकूण सहा मार्गिका आहेत. तर बोगद्याबाहेरचा मार्ग हा चार पदरी म्हणजेच एकूण आठ मार्गिकांचा आहे. या बोगद्यासाठी समुद्रामध्ये भराव घालण्यात आला. त्यावर निर्माण झालेल्या २०० एकर जमिनीवर एक आणि महालक्ष्मीच्या रेसकोर्सवरील सव्वाशे एकरांवर एक अशी दोन मोठी उद्याने उभी राहणार असून ती देखील एका बोगद्याने जोडली जाणार आहेत.

समजून घ्या, अत्याधुनिक मुंबईचा चकीत करणारा नवा प्रवास!

Story img Loader