आकाशात ढग तर आपण नेहमीच पाहातो पण त्यांची लांबी – रूंदी किती असते? वीजांचा चमचमाट आणि ढगांचा गडगडाट केव्हा होतो? तुफान वादळातही दर १५ मिनिटांनी कुठून संदेश नियमित जातो आणि त्याचा आपत्ती व्यवस्थापनाला नेमका कोणता आणि कसा फायदा होता? पाऊस आणि आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित अशा अनेक उत्सुकतापूर्ण प्रश्नांची उत्तरे समजून घ्यायची असतील तर कुलाबा वेधशाळेच्या संदर्भातील ‘गोष्ट मुंबईची’चा हा भाग अवश्य पाहायलाच हवा!