किल्ल्याच्या भोवती असलेल्या मोकळ्या जागेला एस्प्लनेड म्हटलं जायचं. १८६० च्या सुमारास किल्ल्याची तटबंदी पाडून ओव्हल, कुपरेज, क्रॉस व आझाद अशी चार मैदाने बनवण्यात आली. मुंबईत मिनी लंडन उभारण्याच्या कल्पनेतून या भागात तशा प्रकारची नावं देण्यात आली. लंडनमधल्या ओव्हल मैदानाच्या धर्तीवर त्यांनी मुंबईतही ओव्हल मैदान उभारलं. या भागात कदाचित इरॉस सिनेमाच्या जागी पवनचक्की होती. त्यामुळेच चर्चगेट या द्वाराला मराठी लोक पवनचक्की गेट म्हणायचे. नारळी पौर्णिमा मोठ्या उत्साहात या भागात साजरी केला जायचा. ओव्हलच्या एका बाजुला आहेत कलोनियल शैलीतील इमारती तर दुसऱ्या बाजुला आहेत आर्ट डेको शैलीतील इमारती… हा इतिहास सांगतायत खाकी टूर्सचे भारत गोठोसकर…
‘गोष्ट मुंबईची’ या व्हिडीओ सीरिजचे सर्व भाग पाहण्यासाठी येथे क्लिक करा.