परेल येथे स्थायिक असणारे ८५ वर्षीय मुरारी पांचाळ हे गेल्या ३० वर्षांपासून एसटी प्रवाशांची अनोख्या पद्धतीने मदत करत आहेत. मुरारी पांचाळ हे दादरच्या एसटी बस थांबा येथे येणाऱ्या प्रवाशांना एसटीची वेळ, कोणती एसटी कशी? कोणत्या मार्गे जाते? याची सर्व माहिती देत असतात. अनेकदा ऐनवेळी एसटी बसची माहिती काढताना प्रवाशांची दमछाक होते. अशावेळी मुरारी पांचाळ हे प्रवाशांच्या मदतीला धावून जातात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोहिनूर मिलमधील नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर मुरारी पांचाळ यांनी आपला काहीवेळ या प्रवाशांच्या मदतीसाठी सार्थकी लावायचं ठरवलं. दररोज सकाळी ६.३० ते ८.३० दरम्यान ते एसटी थांब्यावर न चुकता जातात. मुरारी पांचाळ यांच्या या नि:स्वार्थ सेवेमुळे थांब्यावरील कर्मचाऱ्यांचा काहीसा ताणही कमी होतो. कारण प्रवाशांना अपेक्षित असलेली माहिती ते अचूक देत असतात. पांचाळ यांनी एसटी प्रवाशांना मदत करण्याचा निर्धार करण्यामागे एक घटना कारणीभूत ठरली होती. ती घटना काय होती? त्यांचा हा असामान्य प्रवास जाणून घेऊ या.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Goshta asamanyanchi 85 year old murari panchal known as bhau has been helping passengers for the last 30 years by informing them about st buses time and route at dadar pck