कल्याण येथे राहणारे अनंत जोशी यांना देशविदेशातील वेगवेगळ्या प्रकारच्या टोप्यांचा संग्रह करण्याचा छंद आहे. जिरेटोप, युद्धकालीन शिरस्त्राण, पोलिसांच्या टोप्या अशा जगभरातील जवळपास ३५०० पेक्षा अधिक टोप्यांचा संग्रह त्यांच्याकडे आहे. याची दखल लिम्का बुक ऑफ रेकाॅर्डमध्येही घेण्यात आली आहे. कल्याण येथे आपल्या घराजवळच त्यांनी आपल्या शिरोभूषण संग्रहालयात या टोप्यांचा खजिना ठेवला आहे.
वयाच्या आठव्या वर्षापासून त्यांना हा छंद जडला. या दरम्यान त्यांना अर्धांगवायूचा झटकाही आला होता. त्यामुळे घरी थांबून आराम करणंही गरजेचं होतं. मात्र त्यांनी ध्यास सोडला नाही. देशविदेशात जाऊन टोप्यांचा संग्रह करण्याचं त्यांचं काम सुरूच होतं. टोप्यांबद्दलची ही आवड त्यांच्यात कशी निर्माण झाली? याव्यतिरिक्त त्यांच्याकडे आणखी कोणत्या दुर्मिळ वस्तूंचा संग्रह आहे हे जाणून घेण्यासाठी संपूर्ण व्हिडीओ पाहा.