मुंबईत राहणारे किरण शिंदे हे मिनिएचर आर्टिस्ट आहेत. गणपतीची लघू आकारातील इको फ्रेंडली मूर्ती ते साकारतात. किरण यांना लहानपणापासूनच गणपतीची प्रचंड आवड होती. ही आवड त्यांनी आपल्या कलेच्या रुपात जपली. एक, दीड, नऊ, ११ इंच अशा लघू मूर्ती ते साकारतात. गणेश मूर्ती साकारताना किरण ती शास्त्रोक्त पद्धतीने साकारतात. म्हणजेच मूर्तीत गणेश यंत्र, त्रियंत्र, मूलाधारचक्र स्थापित केलेलं असतं. एक मूर्ती साकारण्यासाठी तीन दिवस लागतात. विशेष म्हणजे मूर्तीवरील सर्व दागिने ते चॉकलेट आणि कॅडबरीच्या सोनेरी आवरणाच्या कागदाने तयार करतात. किरण यांची ही मिनिएचर कला पाहून अनेकजण त्यांच्याकडून घरची गणेश मूर्ती तयार करून घेतात, मात्र ती विसर्जित केली जात नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हिडीओ पाहा :

असेच माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी लोकसत्ताच्या युट्युब चॅनलला नक्की भेट द्या…

व्हिडीओ पाहा :

असेच माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी लोकसत्ताच्या युट्युब चॅनलला नक्की भेट द्या…