मुंबईत राहणारा २५ वर्षीय वरुण सावंत हा आशियातील पहिला स्वमग्न (ऑटिस्टिक) मॅरेथॅान धावपटू आहे. वरुणने २०२० सालच्या टाटा मुंबई मॅरेथाॅनमध्ये ४४ किमीचं अंतर चार तास आणि २७ मिनिटांत पूर्ण करून नवा विक्रम रचला होता. टाटा मुंबई मॅरेथॅान असो किंवा शहराबाहेरच्या मॅरेथॉन स्पर्धा असो वरुण त्यात उत्साहाने सहभाग घेत असतो.
इतकंच नव्हे तर वरुणने बीएससी हॅास्पिटॅलिटी मॅनेजमेंटमध्ये आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे. शिवाय लॅाकडाऊनमध्ये त्याने आपला बेकरी व्यावसायही सुरू केला. आटिझम हा आपल्या आयुष्याचाच एक भाग आहे, असं म्हणत वरुण जिद्दीने आपली आवड जपत आहे. ऑटिझममुळे निर्माण होणाऱ्या अडथळ्यांवर मात करणाऱ्या वरुणाचा हा असामान्य प्रवास नक्की पाहा.