माधवी राणे चिखले या पंजाबच्या मोहाली येथील फोर्टीस रुग्णालयात मुख्य परिचारिका अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्या मूळच्या मुंबईच्या आहेत. नुकताच त्यांना आरोग्य क्षेत्रातील राष्ट्रीय पातळीवरील ‘फ्लोरेन्स नाईटिंगेल’ पुरस्कार राष्ट्रपती द्रोपदी मुर्मूंच्या हस्ते प्रदान करण्यात आला. माधवी चिखले यांना खरंतर या क्षेत्रात यायचं नव्हतं. पंरतु तरीही त्यांनी नर्सिंग क्षेत्र स्वीकारलं आणि स्वतःला सिद्ध केलं.
त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. माधवी यांचा निर्णय योग्य होता याचा अभिमान त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना आहे. आज नर्सिंग क्षेत्रात येणाऱ्या अनेक तरुणींसाठी त्या आदर्श ठरत आहेत.
‘गोष्ट असामान्यांची’ या लोकसत्ता लाइव्हच्या विशेष मालिकेतील आणखी व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.