लोकमान्य टिळकांनी मूहूर्तमेढ रोवलेला सार्वजनिक गणेशोत्सव मुंबईतही सुरू झाला; त्याने या शहरात चांगलेच मूळ धरले, स्वातंत्र्य चळवळीलाही त्याचा फायदाच झाला. स्वातंत्र्यानंतर दीर्घकाळ म्हणजे तब्बल ३५ वर्षे या सार्वजनिक गणेशोत्सवाचे केंद्र होते ते गिरणगावामध्ये. दूर उपनगरातून मुंबईकर गणेशभक्त यायचे ते गिरणगावात गणेशदर्शनाच्या ओढीने. मात्र १९८२ हे साल आणि लोकसत्ता निमित्तमात्र ठरले. याच वर्षी आघाडीचे व विश्वसनीय वृत्तपत्र असलेल्या लोकसत्ताने गणेशदर्शन स्पर्धेला सुरुवात केली. सार्वजनिक गणेश मंडळांसाठी सुरू झालेली ही पहिलीच स्पर्धा होती. गणेशमूर्ती- देखावे या साऱ्यांसाठी आकर्षक बक्षिसे होती. या स्पर्धात्मकतेने मुंबईतील गणेशदर्शनाचा केंद्रबिदू उपनगरांच्या दिशेने नेण्याचे काम केले कारण या स्पर्धेत येणारी पहिली तिन्ही मंडळे नंतरच्या अनेक वर्षांसाठी अंधेरी परिसरातील होती. तर पूर्व उपनगरामध्ये ती भांडूप आणि कांजूरमार्गची होती… साहजिकच गणेशभक्तांचा ओघ दर्शनासाठी मुंबई उपनगरांच्या दिशेने सुरू झाला आणि मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सवाचा इतिहास बदलला!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा