गोवंडीतील शिवाजी नगर परिसरातील जुलै महिन्यात एका घरात चार मृतदेह सापडल्या प्रकरणी पोलिसांच्या तपासात पत्नी आणि दोन मुलांची हत्या करून कुटुंबप्रमुख शकील खान याने आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. अखेर रविवारी याप्रकरणी मृत शकील खान विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला.
हेही वाचा >>> पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्ग अखेर पालिकेकडे; मार्ग हस्तांतरित करण्याबाबत एमएमआरडीएला पत्र
शकील जलील खान (३४), रजिया खान (२५), सरफराज खान (७) आणि अतिसा खान ( ३) यांचे मृतदेह २९ जुलैला शिवाजी नगर परिसरातील बैंगनवाडी येथील राहत्या घरी सापडले होते. याच परिसरात त्याचे किराणा मालाचे दुकान होते. याप्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली होती. याप्रकरणी पोलिसांनी केलेल्या तपासात शकील खाननेच पत्नी व मुलांना वीष देऊन त्यांची हत्या केली. त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले. कर्जबाजारीपणाला कंटाळून त्याने हे पाऊल उचलल्याचे तपासात उघड झाले आहे. तपासी अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून रविवारी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.