मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या आठवणी आजही अनेकांच्या मनात ताज्या आहेत. या हल्ल्यात मुंबईला सुरक्षित ठेवण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांची बाजी लावली. २६/११ दहशतवादी हल्ल्यातील अतिरेक्यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना मारण्याचा प्रयत्न करणारे सरकारी कर्मचारी मारुती फड हे देखील शूरवीरांपैकी एक आहेत. केवळ देव बलवत्तर म्हणून त्यांचे प्राण वाचले. मारुती फड यांच्या तोंडून २६/११ चा चित्तथरारक अनुभव ऐकताना अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही.

मुंबई पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी कथन केलेला २६/११ हल्ल्याचा अनुभव पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Story img Loader